दहावीचा निकाल जाहीर , कधी आणि कुठे पाहाल …Maharashtra SSC 10th Results 2024
Maharashtra SSC 10th Results 2024
Maharashtra SSC 10th Results 2024: दहावीच्या निकालाची विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होते. शेवटी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपलीये. दहावीचा निकाल आज लागलाय. बोर्डाकडून विभागीय टक्केवारी दहावीच्या निकालाची जाहीर केलीये.
शालेय जीवनाचा टप्पा ओलांडून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकण्याचा आणखी एक टप्पा म्हणजे इयत्ता दहावीचा निकाल. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांच निकाल आज (27 मे 2024) लागणार आहे.
अधिकृत माहितीनुसार दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तर, सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निकालाबद्दल माहिती देतील. ज्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईट दहावीचा निकाल पाहता येईल.
शंभर टक्के गुण मिळालेले विद्यार्थी
पुणे – 10
नागपुर – 1
संभाजी नगर – 32
मुंबई – 8
कोल्हापूर – 7
लातूर – 123
कोकण – 3
राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक लागला असून, या निकालाची आकडेवारी आहे 99.45%. तर, सर्वात कमी निकाल
वर्धा जिल्ह्यात लागला असून, या निकालाची आकडेवारी आहे 92.02 %.
Maharashtra SSC Board Result 2024 LIVE Updates: संपूर्ण मार्कशीट पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
विभागीय निकाल देखील मंडळाकडून जाहीर केलाय. राज्यभरातील अनेक शाळांचे निकाल 100 पैकी 100 टक्के लागले आहेत. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली. विशेष म्हणजे भरारी पथकांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली. परीक्षा केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली. विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात धमाका केलाय.