महाराष्ट्र पोलीस भरती 2025 — खाकीच्या स्वप्नासाठी तरुणांची धडपड! | Youth Rush for Maharashtra Police Jobs!

Youth Rush for Maharashtra Police Jobs!

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी राज्यभरात इच्छुक उमेदवारांनी सज्जता दाखवली आहे. यंदा तब्बल १५,००० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, नाशिक ग्रामीण पोलीस दलात एकूण ३८० पदे भरणार आहेत. यात होमगार्ड उमेदवारांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अर्ज नोंदणी www.nashikruralpolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली आहे.

Youth Rush for Maharashtra Police Jobs!

या भरतीत नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० शिपाई, ५२ चालक आणि कारागृह दलात ११८ शिपाई पदे समाविष्ट आहेत. गृह मंत्रालयाकडून भरतीची घोषणा होताच सर्व घटकांत हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, नाशिक शहरात यंदा रिक्त पदे नसल्याने तेथे भरती जाहीर झालेली नाही, मात्र ग्रामीण भागातील भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नव्या पोलिस कर्मचाऱ्यांची मोठी फौज तयार होईल.

सन २०२३ मध्ये १५० आणि २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती पार पडली होती. यंदाच्या भरतीसाठी बारावी ते उच्चशिक्षित उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे.

भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:

  • अर्ज नोंदणी फक्त www.nashikruralpolice.gov.in वरच करता येईल.
  • उमेदवाराला एकच अर्ज नोंदवण्याची परवानगी.
  • सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार.
  • प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी, त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा.
  • शारीरिक चाचणीनंतर गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड.
  • शेवटी कागदपत्र पडताळणी आणि अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनी आता खऱ्या अर्थाने कंबर कसली असून, राज्यभरात पोलिस भरतीचे वातावरण तापले आहे!

Comments are closed.