बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून करता येणार अर्ज | Maharashtra HSC Supplementary Time Table 2024

Maharashtra HSC Supplementary Time Table 2024

0

Maharashtra HSC Supplementary Time Table 2024: फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी २७ मे पासून ऑनलाईन अर्ज भरू शकतील.

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे) विद्यार्थी यांची आवेदनपत्रे सोमवार, २७ मे पासून शुक्रवार, ७ जून २०२४ पर्यंत नियमित शुल्कासह भरता येतील. तर विलंब शुल्कासह अर्ज ८ जून ते १२ जून २०२४ या कालावधीत भरता येतील.

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख ३१ मे ते १५ जून २०२४ अशी असून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार १८ जून २०२४ अशी आहे.

पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच ती भरावीत. आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून

राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत भरल्यानंतर ३१ मे ते १५ जूनपर्यंत महाविद्यालयांनी चलनाव्दारे शुल्क बँकेत भरायचे आहे. तसेच १८ जूनला महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायच्या आहेत. अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये आता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे

पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाने परीक्षेसंदर्भातील परिपत्रक शुक्रवारी जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.