महापारेषण निकाल लांबला ! – Mahapareshan Result Delayed !

Mahapareshan Result Delayed !

नाशिकसह राज्यभरातील उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. महापारेषण कंपनीमार्फत लोअर डिव्हिजनल क्लर्क पदासाठी १ ऑगस्टला घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेला तीन महिने उलटले, तरीही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

Mahapareshan Result Delayed !२६० पदांसाठी घेतलेल्या या परीक्षेला तब्बल २६ हजार ३३६ उमेदवारांनी हजेरी लावली होती, मात्र निकाल जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आणि चिंतेचं वातावरण आहे.

२३ सप्टेंबरला ‘प्रशासकीय कारणास्तव उशीर होत आहे’ अशी एक छोटी नोटीस प्रसिद्ध झाली होती, पण त्यानंतरही ४० दिवसांहून अधिक काळ उलटला, तरीही कोणतीही पुढील माहिती दिली गेली नाही.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले की, “निकाल जाहीर करण्याची अचूक तारीख तातडीने कळवावी, नाहीतर हजारो उमेदवारांचा मानसिक तणाव वाढतो आहे.”
उमेदवार आता महापारेषणकडून स्पष्ट उत्तर किंवा तत्काळ निकाल जाहीर होण्याची अपेक्षा करत आहेत.

Comments are closed.