महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 दरम्यान नाशिकमधील एका परीक्षा केंद्रावर गंभीर गोंधळ उघडकीस आला. इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना चुकून मराठी प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
उमेदवारांनी तत्काळ तक्रार करूनही वेळेत प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आल्या नाहीत. या घटनेचा अहवाल तत्काळ राज्य परीक्षा परिषदेकडे पाठवण्यात आला होता.
संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांची चौकशीही झाली, मात्र तब्बल तीन आठवडे उलटूनही कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा प्रकार दडपला जात आहे का, असा संतप्त सवाल परीक्षार्थींनी उपस्थित केला आहे.
चुकीचा पेपर मिळालेल्या उमेदवारांनी पुन्हा परीक्षा न घेता न्याय द्यावा, अशी मागणी केली असून, निकाल व निर्णयाच्या प्रतीक्षेत ते अद्याप आहेत. शिक्षण विभाग व परीक्षा परिषदेकडून मात्र स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे.

Comments are closed.