एमएससीईतर्फे घेण्यात आलेली MAHA TET 2025 परीक्षा 23 नोव्हेंबरला पार पडली असून, आता उमेदवारांसाठी पेपर 1 आणि पेपर 2 ची कटऑफ माहिती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 8 साठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही पात्रता परीक्षा अनिवार्य आहे.
कटऑफ म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे किमान गुण. ठरलेले किमान गुण मिळाल्यास उमेदवारांना MAHA TET प्रमाणपत्र दिले जाते.
MAHA TET मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही 150 गुणांचे असतात. एमएससीईने सामान्य प्रवर्गासाठी 90 गुण आणि राखीव प्रवर्गासाठी 82 गुण इतके किमान गुण ठरवले आहेत. तसेच उत्तीर्ण टक्केवारी सामान्यसाठी 60% आणि राखीवसाठी 55% अशी आहे.
कटऑफ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर “MAHA TET Cut Off 2025” या लिंकवर क्लिक करून कॅटेगरीनुसार गुणांची माहिती पाहू शकतात.

Comments are closed.