खुशखबर, नोकरी हवी? महारोजगार मेळावा 2025 आयोजित, त्वरित अर्ज करा!
महा रोजगार मेळावा 2025
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. रोजगार मेळावा २०२५ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, धाटाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदवारांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळावा 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, धाटाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील खाजगी उद्योजकांनी आपल्या आस्थापनांतील कुशल व अकुशल रिक्त पदांची माहिती रोजगार कार्यालयाला द्यावी. शासनाच्या माध्यमातून या रोजगार मेळाव्यात खाजगी कंपन्यांमधील अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
नोंदणीसाठी rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर जाऊन Employer Login करावे आणि रिक्त पदांची नोंदणी करावी. Pandit Dindayal Upadhyay Job Fair या पर्यायाद्वारे आवश्यक माहिती भरून 24 जानेवारी 2025 पूर्वी रिक्त पदे अपलोड करावीत. जे उद्योजक नवीन नोंदणी करू इच्छितात, त्यांनी Employment → Employer (List a Job) → Register या पर्यायांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी 02141-222029 किंवा 9421613757 (महेश भा. वखरे, लिपिक-टंकलेखक) या क्रमांकावर संपर्क साधावा. सहायक आयुक्त म. अ. मु. पवार, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांनी उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
