इराण–अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जगभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा परिणाम भारतावरही झाला असून केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत 14.2 किलोचा गॅस सिलेंडर मिळत होता, पण आता तोच सिलेंडर 8 ते 10 किलो गॅसने भरून दिला जाणार आहे. म्हणजे सिलेंडरचे वजन कमी होणार आणि त्यामुळे गॅसही कमी दिवस चालणार आहे. मात्र, ग्राहकांकडून जितका गॅस दिला जाईल तितक्याच प्रमाणात पैसे घेतले जाणार आहेत.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅस फील्ड आणि तेल साठ्यांवर हल्ले झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही महिने गॅसची टंचाई कायम राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत सरकारने गॅसचा पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आधीच गॅस कमी पडण्याच्या भीतीने नागरिकांनी एजन्सीबाहेर रांगा लावल्या होत्या. हॉटेल व व्यावसायिक क्षेत्रावरही परिणाम झाला होता. मात्र, आता व्यावसायिक LPG पुरवठ्यात 20% वाढ केल्याने हॉटेल आणि अन्न उद्योगांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
तसेच, या युद्धाचा परिणाम इतर व्यवसायांवरही झाला असून मिनरल वॉटरच्या बाटल्यांचे दर वाढले आहेत. कच्चा माल महाग झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.

Comments are closed.