सोलापूर जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या बऱ्याच प्रमाणात घसरलीये, तिथं आता अधिकाऱ्यांची पथकं थेट भेटी देणार आहेत!
गुणवत्ता घसरली, शिक्षकांची अनास्था वाढली, गावातच नव्या खासगी स्पर्धक शाळा उभ्या राहिल्या – या सगळ्या कारणांमुळे शाळेतून विद्यार्थ्यांचा ओघ कमी झालाय.
आता काय होणार?
घटलेली पटसंख्या असलेल्या शाळांची गुणवत्ता तपासली जाईल
शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांची जबाबदारी निश्चित केली जाईल
आढळले तर संबंधितांवर कारवाई होणार
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले:
“पठसंख्या वाढलेली, स्थिर असलेली आणि घटलेली – अशा तिन्ही प्रकारच्या शाळांची माहिती मागवलीय. संबंधित शाळांवर भेट देऊन घटती पटसंख्या का झाली, यावरून जबाबदारी ठरवून निर्णय घेतला जाईल.”
संचमान्यता कधीच्या पटावर? ३१ जुलै की ३० सप्टेंबर?
शिक्षण विभागामध्ये यावरही संभ्रम आहे. एकीकडे ३१ जुलैची पटसंख्या ग्राह्य धरली जाणार, असं म्हणतात, पण अजूनही जुना शासन निर्णय रद्द झालेला नाही. त्यामुळे शिक्षक संभ्रमातच!