राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘आई’ या विशेष महिला-केंद्रित पर्यटन धोरणाची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १५ लाख रुपयांपर्यंतचे विनातारण व बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. छोटा किंवा मोठा पर्यटन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तसेच आधीच व्यवसायात असलेल्या महिलांसाठी ही योजना परिवर्तनकारी ठरू शकते.

पर्यटन क्षेत्रातील ४१ प्रकारच्या व्यवसायांसाठी हे कर्ज उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे कर्ज पूर्णपणे विनातारण व व्याजमुक्त असल्याने महिलांना मोठा आर्थिक आधार मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत — व्यवसाय पूर्णतः महिलांच्या मालकीचा असावा, किमान ५०% महिला कर्मचारी कामावर असाव्यात, तसेच पर्यटन संचालनालयात नोंदणी अनिवार्य आहे.
या योजनेंतर्गत मंजूर होणारे १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वेळेवर फेडल्यास त्यावरील जास्तीत जास्त १२% व्याजरक्कम सरकार परत देते. हा व्याज परतावा ७ वर्षे, किंवा कर्जफेड पूर्ण होईपर्यंत, किंवा एकूण ४.५० लाखांच्या मर्यादेपर्यंत — यापैकी जे आधी पूर्ण होईल तेवढा दिला जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच नाशिक येथील पर्यटन भवनात संपर्क (०२५३-२९९५४६४) किंवा ई-मेल dd*****************@*ov.in वरूनही माहिती मिळवू शकता.

Comments are closed.