महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) एलएलबी ३ वर्षे आणि बी.एड (जनरल, स्पेशल तसेच ELCCT) अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
इच्छुक उमेदवारांना ८ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी करता येणार असून २३ जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.
एलएलबी ३ वर्षांच्या अभ्यासक्रमाची परीक्षा २७ ते २९ मार्चदरम्यान होण्याची शक्यता आहे. तर बी.एड (जनरल/स्पेशल) आणि बी.एड ELCCT साठी परीक्षा १ व २ एप्रिल रोजी आयोजित केली जाणार आहे. या सर्व तारखा संभाव्य असून अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.
सीईटी सेलने स्पष्ट केले आहे की अर्ज भरण्यासाठी अपार आयडी अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अपार आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो डिजीलॉकरच्या माध्यमातून तयार करावा. तसेच ३ वर्षे व ५ वर्षे एलएलबी अभ्यासक्रमांसाठी अर्ज स्वतंत्रपणे भरावा लागेल, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
अर्ज प्रक्रिया, माहिती पुस्तिका आणि पुढील अपडेट्ससाठी उमेदवारांनी cetcell.mahacet.org / www.mahacet.org
या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.