भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने २०२५ साली मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीतून एकूण ८४९ पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (AAO – Generalist/Specialist) आणि असिस्टंट इंजिनीअर या गटांमध्ये विभागली आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, यामध्ये निवड झाल्यास जवळपास १.६९ लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

रिक्त पदांची संख्या व तपशील
या भरतीत तीन प्रमुख प्रकारची पदे आहेत :
- AAO Generalist – ३५० पदे
- Assistant Engineer – ८१ पदे
- AAO Specialist – ४१० पदे
एकूण ८४९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. LIC च्या अधिकृत वेबसाइटवरून (licindia.in) उमेदवारांना थेट अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता – आवश्यक अर्हता कोणती?
- AAO Generalist साठी – कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र आहेत.
- Assistant Engineer साठी – AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E./B.Tech (Civil/Electrical) पदवी असावी.
- AAO Specialist साठी – उमेदवार CA, ICSI, LLB किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवारांसाठी महत्वाची अट
अर्जदाराचे किमान वय २१ वर्षे असावे. तर कमाल वय ३०–३२ वर्षे दरम्यान असावे. ही वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२५ रोजीच्या स्थितीनुसार मोजली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३ ते ५ वर्षे वयात सूट मिळणार आहे.
अर्ज शुल्क किती?
- SC/ST/दिव्यांग उमेदवार – ₹८५ + व्यवहार शुल्क + GST
- इतर सर्व उमेदवार – ₹७०० + व्यवहार शुल्क + GST
निवड प्रक्रिया – तीन टप्प्यांत परीक्षा
एलआयसीच्या या भरतीत निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असेल.
१) प्राथमिक परीक्षा
२) मुख्य परीक्षा
३) मुलाखत व वैद्यकीय तपासणी
प्राथमिक परीक्षेतील गुण अंतिम यादीत मोजले जाणार नाहीत. मात्र मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे अंतिम निवड होईल.
अर्ज कसा कराल?
१) सर्वप्रथम उमेदवारांनी www.licindia.in या वेबसाइटला भेट द्यावी.
२) त्यानंतर Careers विभागात जाऊन LIC AE/AAO Recruitment 2025 वर क्लिक करावे.
३) ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आवश्यक माहिती भरावी.
४) अर्ज शुल्क ऑनलाईन भरून अर्ज सबमिट करावा.
५) शेवटी अर्जाचा प्रिंटआउट घ्यावा.
महत्वाच्या तारखा व लिंक्स
- नोंदणी सुरू – १६ ऑगस्ट २०२५
- शेवटची तारीख – ८ सप्टेंबर २०२५
- अधिकृत वेबसाइट 👉 licindia.in
- अर्जासाठी थेट लिंक 👉 ibpsonline.ibps.in/licjul25

Comments are closed.