महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक सोबत संलग्नित महाविद्यालयातील ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण ही पदे शिक्षक संवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार कराठा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, राज्यातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये या पदांना आधीच शिक्षक संवर्गात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनीही तसाच नमुना अवलंबून कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय वैद्यकीय परिषदेकडे पाठवण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना शैक्षणिक दर्जा आणि मानधनात वाढ मिळण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. या निर्णयामुळे आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.