महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण ही पदे शिक्षक संवर्गात समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये या पदांचा शिक्षक संवर्गात समावेश आधीच झाला आहे, त्यामुळे आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्येही तशाच प्रकारे कार्यवाही व्हावी.
या प्रस्तावासाठी केंद्रीय वैद्यकीय परिषदेकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले असून बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.