लेक लाडकी योजना 2025 — मुलींना १,०१,००० रुपये मिळवण्याची सुवर्णसंधी! | Lek Ladki Yojana 2025 — ₹1,01,000 for Girls!

Lek Ladki Yojana 2025 — ₹1,01,000 for Girls!

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता आणि समाजातील लिंगभेद कमी करण्याच्या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या १८ व्या वर्षापर्यंत शिक्षण आणि पालनपोषणासाठी ₹ १,०१,००० थेट बँक खात्यावर दिली जातील.

Lek Ladki Yojana 2025 — ₹1,01,000 for Girls!

टप्प्याटप्प्याने लाभ
लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आर्थिक मदत मिळते. जन्मानंतर पहिल्या टप्प्यात ₹५,०००, इयत्ता पहिलीत ₹६,०००, इयत्ता सहावीत ₹७,०००, इयत्ता अकरावीत ₹८,००० आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यावर अंतिम टप्प्यात ₹७५,००० मिळते. एकूण या योजनेतून जन्मापासून १८ वर्षांपर्यंत मुलीला ₹१,०१,००० मिळण्याची संधी आहे.

पात्रता निकष

  • मूळ रहिवासी: अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक.
  • उत्पन्न मर्यादा: वार्षिक उत्पन्न ₹ १ लाखापेक्षा कमी.
  • रशन कार्ड: केशरी (Orange) किंवा पिवळे (Yellow).
  • अपत्यांची अट: फक्त दोन अपत्यांची परवानगी; दुसऱ्या नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा पुरावा आवश्यक.
  • जन्माची तारीख: १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेली मुलगी.

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र (₹ १ लाखापेक्षा कमी)
  • रेशन कार्ड
  • मुलीचा जन्म दाखला
  • आई-वडिलांचे आधार कार्ड
  • बँक पासबुक (आई किंवा मुलीच्या नावावर)
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  • स्वयंघोषणा पत्र
    शिक्षण प्रमाणपत्र (सध्याचे बोनाफाईड)

अर्ज प्रक्रिया (ऑफलाईन)

  • फॉर्म मिळवा: जवळच्या अंगणवाडी केंद्रातून किंवा PDF डाउनलोड करून प्रिंटआऊट.
  • माहिती भरा: फॉर्म काळजीपूर्वक व अचूक माहिती भरा.
  • कागदपत्रे जोडा: सर्व आवश्यक झेरॉक्स प्रती फॉर्मसोबत जोडा.
  • सादर करा: अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिकेकडे फॉर्म सुपूर्द करा.
  • पडताळणी: विभागाकडून अर्जाची पडताळणी होईल आणि मंजूर झाल्यावर हप्त्यांमध्ये पैसे मिळणे सुरू होईल.

लेक लाडकी योजना मुलींच्या शिक्षण आणि पालनपोषणासाठी सुरक्षित आर्थिक भविष्य देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे.

Comments are closed.