लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! जानेवारी–फेब्रुवारीचा ₹३००० हप्ता एकत्र मिळणार? | Ladki Bahin Yojana ₹3000 Installment Together?

Ladki Bahin Yojana ₹3000 Installment Together?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारा जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, त्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता वाढली आहे. जानेवारी महिना संपूनही हप्ता न मिळाल्याने आता जानेवारीसोबत फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का? असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे.

Ladki Bahin Yojana ₹3000 Installment Together?

सध्या उपलब्ध माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. फेब्रुवारी महिना सुरू होऊनही महिलांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकांपूर्वी हप्ता जमा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र आता हा हप्ता आणखी पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता चर्चेत आली आहे. जर जानेवारीचा हप्ता पुढे ढकलला गेला, तर दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ₹३००० रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारकडून लवकरच यासंदर्भात स्पष्ट निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून, तोपर्यंत लाडक्या बहिणींनी अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.