NEET UG अर्जासाठी आज अंतिम संधी!-Last Day to Apply for NEET UG!

Last Day to Apply for NEET UG!

वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या NEET UG 2026 परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेस राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ११ मार्च पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध आहे.

Last Day to Apply for NEET UG!अधिकृत माहितीनुसार, उमेदवारांना रात्री ९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार असून अर्ज शुल्क भरण्यासाठी रात्री ११.५० वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एनटीएने जारी केलेल्या सूचनेत स्पष्ट केले आहे की, हीच अंतिम मुदत असून यानंतर अर्जासाठी कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि वेळेत अर्ज सादर करावा.

पूर्वी ८ मार्च ही अर्जाची अंतिम तारीख होती. मात्र काही विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येत असल्यामुळे एनटीएने विद्यार्थ्यांना दिलासा देत ११ मार्चपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.