महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) गुंतवणुकीसाठी एक फायदेशीर पर्याय ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 7.5% व्याजदर मिळतो, जो कोणत्याही अल्पकालीन बचत योजनेपेक्षा अधिक आहे. ही योजना केवळ 2 वर्षांसाठी असून 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत आहे.
2023 मध्ये सुरू झालेली ही योजना महिला गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे. मात्र, 1 एप्रिलपासून या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. केंद्र सरकारने योजनेच्या मुदतवाढीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे इच्छुक महिलांनी 31 मार्चच्या आतच बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक करावी.
या योजनेत किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते, तर जास्तीत जास्त मर्यादा 2 लाख रुपये आहे. दोन वर्षांत परिपक्व होणाऱ्या या योजनेंतर्गत महिलांना निश्चित परतावा मिळतो. देशभरातील सर्व बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडता येते, त्यामुळे सहज गुंतवणुकीचा मार्ग खुला आहे.
योजना लवकरच बंद होणार असल्याने संधीचा फायदा घेऊन महिलांनी त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा!