भूकरमापक परीक्षा १३-१४ नोव्हेंबर!-Land Surveyor Exam Nov 13-14!

Land Surveyor Exam Nov 13-14!

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) या संवर्गातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे विभागातील रिक्त पदे भरली जाणार असून उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

Land Surveyor Exam Nov 13-14!या परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक आणि प्रवेशपत्राची लिंक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahabhumi.gov.in उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहे.

या भरतीसाठी १ ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची परीक्षा आता घेण्यात येणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात पुणे आणि अमरावती विभागातील उमेदवारांची परीक्षा सकाळी ८ वाजता होणार आहे. दुसऱ्या सत्रात नाशिक आणि नागपूर विभागातील उमेदवारांनी दुपारी १२ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे.

१४ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात मुंबई (कोकण) विभागातील उमेदवारांची परीक्षा सकाळी ८ वाजता होणार असून, दुसऱ्या सत्रात छत्रपती संभाजीनगर विभागातील उमेदवारांनी दुपारी १२ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

भूमि अभिलेख विभागाने सांगितले आहे की या ऑनलाईन परीक्षेबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका लवकरच विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांनी वेळेत संकेतस्थळावर लॉगिन करून प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे.

Comments are closed.