भूमी अभिलेख परीक्षा उद्या!-Land Records Exam Tomorrow!

Land Records Exam Tomorrow!

भूमी अभिलेख विभागातील पदसमूह ४ (भूकरमापक)’ या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रक आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्राची लिंक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahabhumi.gov.in उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

Land Records Exam Tomorrow!ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून, विभागनिहाय वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे —

१३ नोव्हेंबर (गुरुवार): पहिल्या सत्रात पुणे आणि अमरावती विभागातील उमेदवारांची परीक्षा होईल. उमेदवारांनी सकाळी ८ वाजता केंद्रावर उपस्थित रहावे.
दुसऱ्या सत्रात नाशिक आणि नागपूर विभागातील उमेदवारांची परीक्षा असून त्यांनी दुपारी १२ वाजता केंद्रावर पोहोचावे.

१४ नोव्हेंबर (शुक्रवार): पहिल्या सत्रात मुंबई (कोकण) विभागातील उमेदवारांची परीक्षा होईल, त्यांनी सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे.
तर दुसऱ्या सत्रात छत्रपती संभाजीनगर विभागातील उमेदवारांची परीक्षा घेण्यात येईल आणि त्यांनी दुपारी १२ वाजता केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

परीक्षेचे सर्व तपशील, प्रवेशपत्र आणि सूचना पुस्तिका विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांनी नियमितपणे वेबसाइट तपासून आपले admit card डाउनलोड करावे आणि वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे

Comments are closed.