भूमी अभिलेख विभागात मोठ्या प्रमाणावर भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सर्व महसूल विभागांमध्ये मिळून तब्बल ९०३ पदांसाठी ही मेगाभरती होत आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ mahabhumi.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ ऑक्टोबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीअंतर्गत –
पुणे विभागात ८३ जागा,
कोकणात २५९ जागा,
नाशिकमध्ये १२४ जागा,
छत्रपती संभाजीनगर विभागात २१० जागा,
अमरावतीत ११७ जागा,
नागपूरमध्ये ११० जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराकडे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा १०वी उत्तीर्ण आणि ITI (सर्वेक्षक) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच मराठी टंकलेखन (३० शब्द/मि.) आणि इंग्रजी टंकलेखन (४० शब्द/मि.) गतीसह सरकारी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
अर्जदाराचे वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे; मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षांची सूट आहे.
शुल्क:
सामान्य प्रवर्गासाठी ₹१००० आणि मागासवर्गीयांसाठी ₹९०० परीक्षा शुल्क आहे.

Comments are closed.