भूमी अभिलेख विभागाच्या गट-क भूकरमापक संवर्गासाठीच्या भरती परीक्षेचा थरार आता चांगलाच रंगतोय! १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ही ऑनलाइन परीक्षा पार पडणार असून, विभागानुसार स्वतंत्र सत्रांची आखणी करण्यात आली आहे.
पुणे आणि अमरावती विभागातील उमेदवारांसाठी पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजता पहिलं सत्र होईल, तर दुपारी १२ वाजता नाशिक व नागपूर विभागासाठी दुसरं सत्र ठेवण्यात आलं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबरला सकाळच्या सत्रात मुंबई (कोकण) विभागाची परीक्षा तर दुपारच्या सत्रात छत्रपती संभाजीनगर विभागाची परीक्षा घेतली जाणार आहे.
प्रवेशपत्र (Hall Ticket) डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करण्यात आली आहे: https://ibpsreg.ibps.in/gomsep25/
या भरतीसाठी परीक्षाकेंद्र महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात असू शकते, त्यामुळे केंद्र बदलण्याची संधी नाही, असा स्पष्ट निर्देश जमाबंदी आयुक्त व संचालक भू-अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे.
परीक्षेचं वेळापत्रक आणि सविस्तर मार्गदर्शक पुस्तिका लवकरच विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahabhumi.gov.in
प्रसिद्ध होणार आहे. कोणत्याही कारणास्तव तारखा बदलल्यास ती माहिती त्वरित संकेतस्थळावर दिली जाईल.

Comments are closed.