राज्यातील भूमिअभिलेख विभागात लघुलेखक व भूकरमापकांसह एकूण ९०५ पदांसाठी भरती होणार आहे. राज्य शासनाने या भरतीस तत्त्वत: मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या महसुली विभागांमध्ये रिक्त पदांनुसार ही संख्या वाढू शकते.
भूमिअभिलेख विभाग महसूल विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याच्या माध्यमातून जमीन मोजणी प्रकरणे निपटवली जातात. मागील दोन वर्षांपूर्वी १,२०० भूकरमापकांची भरती झाली होती, मात्र सुमारे ७०० जणांनी नोकरी सोडली. त्यामुळे अनेक पदे रिक्त राहून मोजण्यावर परिणाम झाला.
ही स्थिती लक्षात घेऊन भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे भरतीसाठी प्रस्ताव पाठवला, जो मान्य झाला आहे. लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी) पदांसाठी देखील भरतीला मंजुरी मिळाली आहे.
भूकरमापक पदसंख्या:
मुंबई – २५९
नाशिक – १२४
छत्रपती संभाजीनगर – २१०
अमरावती – ११७
नागपूर – ११२
एकूण – ९०५
लघुलेखक पदसंख्या:
उच्च श्रेणी – २
निम्न श्रेणी – ९