मध्यप्रदेशातील लाडली बहिण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. या योजनेचा ३१वा हप्ता कधी मिळणार याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते हा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
सरकारच्या घोषणेनुसार ९ डिसेंबर रोजी छतरपूर जिल्ह्यातील राजनगर (सती की मढिया) येथे आयोजित कार्यक्रमात ३१वा हप्ता DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे. या टप्प्यात सुमारे १.२६ कोटी महिलांच्या खात्यात ₹१,५०० जमा होणार आहेत.
कोणत्या महिलांना लाभ मिळतो?
- मध्यप्रदेशच्या कायमस्वरूपी रहिवासी महिला
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत तसेच अविवाहित महिला
कोण पात्र नाहीत?
- ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाते आहेत
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा अधिक आहे
योजनेविषयी थोडक्यात
लाडली बहिण योजना मे २०२३ मध्ये सुरू झाली. सुरुवातीला पात्र महिलांना ₹१,००० प्रतिमाह देण्यात येत होते. रक्षाबंधन २०२३ नंतर रक्कम ₹१,२५०, तर भाऊबीज २०२५ पासून ती ₹१,५०० करण्यात आली. सध्या पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० थेट खात्यात मिळत आहेत.

Comments are closed.