मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाअंतर्गत मिळणारी रक्कम पतीने दुसऱ्या महिलेला बँकेत हजर करून परस्पर काढल्याची धक्कादायक घटना राजगड येथे समोर आली आहे. संतप्त पत्नीने पतीसह बँकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.

मेहकर तालुक्यातील नेहा विशाल चव्हाण या विवाहितेचा पतीसोबत वाद चालत होता. त्यामुळे ती एक वर्षापासून माहेरी, अकोला जिल्ह्यातील राजनखेड येथे राहत होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरल्याने तिला दरमहा दीड हजार रुपये मिळत होते. महिलेने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या डोणगाव शाखेत बचत खाते उघडले होते, जिथे रक्कम जमा झाली होती.
पण पती विशाल चव्हाण याने बँकेत दुसऱ्या महिलेला नेले आणि बनावट सही करून पत्नीच्या खात्यातून ११ ऑगस्ट २०२५ रोजी २,८०० रुपये परस्पर काढले. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजीही पतीने पुनरावृत्ती केली.
बँकची चौकशी:
शाखाधिकारी सचिन गोडे यांनी सांगितले की, या प्रकरणाची तपासणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे केली जाईल. पैशांच्या स्लिपवरील सह्या जुळतात का, याची तपासणी नंतरच प्रकाराबाबत स्पष्ट होईल. दोन्हीवेळा पैसे काढतानाही बँक कर्मचाऱ्यांनी योग्य शहानिशा केली नव्हती.
याबाबत पत्नीने डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, आता प्रकरणाची पुढील कारवाई पोलिस करत आहेत.

Comments are closed.