लाडकी घोटाळा: ₹६८०० कोटी अपात्रांना!-Ladki Scam: ₹6,800 Cr Lost!

Ladki Scam: ₹6,800 Cr Lost!

निवडणूक आचारसंहितेच्या आधी घाईघाईत जाहीर केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत जबरदस्त गोंधळ उघड झाला आहे. अवघ्या दीड महिन्यात तब्बल २.५९ कोटी महिलांनी अर्ज केले, पण पडताळणी नीट न झाल्यामुळे ४२ लाख अपात्र महिलांनी ११ महिन्यांत तब्बल ₹६८०० कोटींचा फायदा उचलला आहे.

Ladki Scam: ₹6,800 Cr Lost!शासनाने अर्ज पडताळणीसाठी समित्या नेमल्या, पण घाईमुळे अर्जातील दस्तऐवजांची योग्य तपासणीच झाली नाही. परिणामी परराज्यातील महिला, सरकारी महिला कर्मचारी आणि अगदी पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं.

अपात्र अर्जदारांकडून पैसे वसूल करण्याची तयारी सुरू आहे. त्यांनी स्वतः दिलेल्या घोषणापत्राच्या आधारावरच रक्कम मागे घेण्याचा विचार सुरू आहे.

योजनेतलं एक गंभीर वास्तव म्हणजे, सध्या २१ वर्षांच्या महिलांनी अर्ज केलाय. योजना पुढील ४३ वर्षांपर्यंत सुरू राहू शकते, म्हणजेच सरकारवर दीर्घकालीन आर्थिक बोजा येणार!

राजकीय चर्चा वाढल्या…
या योजनेमागचा उद्देश मतांसाठी होता का, यावर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अर्ज भरून घेण्यात आले, पण नंतर कोणीच नीट पडताळणी केली नाही.

Comments are closed.