लाडकी बहीण योजनेत ठाण्यात धडकी भरवणारी अपडेट! | Ladki Bahin Yojana Big Update!

Major Blow to Ladki Bahin in Thane!

लाडकी बहीण योजनेबाबत ठाणे जिल्ह्यातून एक जरा खडबडीत बातमी बाहेर आलीये. बर्‍याच बहिणींचे अर्ज थेट बाद केले गेलेत! ठाण्यातून तब्बल २४ हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरलेत. तुमचं नाव त्या यादीत तर नाही ना… एकदा तपासूनच बघा हं!

 Major Blow to Ladki Bahin in Thane!

महाराष्ट्र सरकारची ही योजना अगदी  पोचलीये. अडीच कोटीच्या आसपास महिला दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मदतीचा फायदा घेतायत. पण याचदरम्यान ठाणे जिल्ह्यातल्या अर्जांची पडताळणी करताना मोठा आकडा समोर आलाय.

ठाणे जिल्ह्यातून एकूण १४,६५,८७६ अर्ज आलेघराघरात होते. त्यापैकी १४,४१,७९८ अर्ज मंजूर, तर २४,०७८ अर्ज बाद. म्हणजे २४ हजार बहिणींना पुढचा हप्ता मिळण्याची शक्यता आता नाही. प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहितीही देण्यात आलीये.

ई-केवायसी नसेल तर हप्ता नाही!
योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी अनिवार्य केलंय. आणि त्यासाठी फक्त ४ दिवसच शिल्लक!
१८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण नाही केली, तर पुढचा हप्ता थेट थांबणार! त्यामुळे ज्यांची ई-केवायसी बाकी असेल, त्यांनी ती लगेच उरकून टाका.

योजनेतील एकूण लाभार्थी किती?
लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू झाली. अर्ज करण्याची मुदत ऑक्टोबर २०२४ पर्यंत होती. राज्यभरातून तब्बल २.५६ कोटी महिलांनी अर्ज केले. पडताळणीदरम्यान यातील लाखो अर्ज बाद झालेत, तर बाकी महिलांना नियमित हप्ते मिळतायत.

Comments are closed.