मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा टप्पा! महिलांच्या खात्यात एकाचवेळी ४,५०० रुपये जमा! | ₹4,500 Installment for Women under Ladki Bahin Yojana!

₹4,500 Installment for Women under Ladki Bahin Yojana!

राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदवार्ता! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे की १७ ऑगस्ट रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा होणार आहे. विशेष म्हणजे, या वेळी एकाचवेळी तीन महिन्यांचे म्हणजेच ४,५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

₹4,500 Installment for Women under Ladki Bahin Yojana!

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या सर्व पात्र महिलांना तीन महिन्यांचे एकत्रित पैसे मिळतील. त्यामुळे लाखो महिलांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे.

योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद
या योजनेसाठी शासनाने तब्बल ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, राज्यात अवघ्या एका महिन्यात १ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. ही योजना दीर्घकाळ सुरू राहणार असून, महिला सक्षमीकरणासाठी ती प्रभावी ठरणार आहे.

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय
‘लाडकी बहीण योजना’मुळे महिलांना आर्थिक बळकटी मिळेल, त्यातून त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्न वाढेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल. मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेसोबत राज्यातील विकासकामांना खीळ न बसता ती अविरत सुरू राहतील.

बहिणाबाईंच्या कवितेचा भावनिक संदर्भ
या योजनेबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रसिद्ध ओळींचा उल्लेख केला —
“अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर.”
मुख्यमंत्री म्हणाले की, “बहिणींच्या हाताला लागणारे हे चटके कमी व्हावेत म्हणूनच आम्ही ही योजना आणली आहे.”

सध्या राज्यभरात महिलांचा उत्साह ओसंडून वाहतोय. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी केंद्रांवर मोठी गर्दी दिसत असून, महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसतो आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही आश्वासन दिलं — “ही योजना थांबणार नाही, उलट अधिक सक्षमपणे पुढे नेली जाईल.”

Comments are closed.