लाडकी बहिणींनी लक्ष द्या!-Ladki Bahin Yojana Alert!

Ladki Bahin Yojana Alert!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून, तिची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ जाहीर करण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्या सर्व पात्र महिलांनी ही कामगिरी तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा योजनेचा ₹१५०० रुपयांचा मासिक लाभ थांबू शकतो.

Ladki Bahin Yojana Alert!महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी “X” या सोशल मीडियावरून यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि नियमित आर्थिक मदत सुनिश्चित करण्यासाठी e-KYC प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

ही प्रक्रिया १८ सप्टेंबर २०२५ पासून अधिकृत संकेतस्थळावर https://ladkibahin.maharashtra.gov.in उपलब्ध आहे. दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, बहुतेक लाभार्थींनी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित भगिनींनीही १८ नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

e-KYC प्रक्रिया कशी कराल?

  • ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
  • Aadhaar क्रमांक आणि कॅप्चा टाकून “Send OTP” वर क्लिक करा.
  • आलेला OTP भरून सबमिट करा.
  • तुमचा जात प्रवर्ग निवडा व आवश्यक घोषणा टिक करा.
  • शेवटी “Submit” करा — आणि “तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली” असा संदेश दिसेल.

Comments are closed.