लाडकी बहीण योजनेला धक्का?-Ladki Bahin Yojana: 40 Lakh at Risk!
Ladki Bahin Yojana: 40 Lakh at Risk!
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून, ती वेळेत पूर्ण न केल्यास लाखो महिलांना योजनेबाहेर जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या सुमारे ३० ते ४० लाख लाभार्थी महिलांची केवायसी अद्याप प्रलंबित असून, त्यामुळे त्यांचा दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो.
या योजनेला दीड वर्ष पूर्ण झाले असून सध्या सुमारे अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत. त्यापैकी अंदाजे १ कोटी ६० लाख महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, निर्धारित मुदतीत केवायसी न केल्यास संबंधित अर्ज बाद केले जाणार आहेत.
सध्या अनेक महिलांकडून केवायसी करताना तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची समस्या आणि केंद्रांवरील गर्दीमुळे विलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र तरीही शासनाने केवायसी पूर्ण करण्याबाबत कठोर भूमिका घेतली असून, वेळेत प्रक्रिया न करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Comments are closed.