लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा मिळून ₹३०००चा हप्ता एकत्र बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी हा निधी वितरित केला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होतील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, मकरसंक्रांतीला निधी वाटप झाल्यास निवडणूक आचारसंहितेचा भंग होतो का, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.
१५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होणार असल्याने या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
भाजप नेत्यांच्या माहितीनुसार, राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. नोव्हेंबर २०२५ चा हप्ता डिसेंबरच्या सुरुवातीलाच खात्यावर जमा झाला असून, आता पुढील दोन हप्त्यांची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे

Comments are closed.