लाडकी बहीण योजनेवर कुणीही चुकीचा प्रचार करीत असेल, तर त्याला बळी पडू नका, कारण जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वैजापूरातील जाहिर सभेत केले. “देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरूच राहणार आहे”, अशी हमी देत त्यांनी उपस्थित नागरिकांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

वैजापूर पंचायत समिती कार्यालय परिसरात भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. या वेळी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, माजी महापौर बापूजी घडामोडे, महिला शहराध्यक्षा डॉ. उज्ज्वला दहिफळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रा वाघ यांनी डॉ. परदेशी यांच्या गेल्या २५ वर्षांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत, “त्यांच्या पुस्तिकेत उल्लेखलेली विकासकामे स्वतःच बोलतात,” असे म्हणत जनतेला मोठ्या मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी जयश्री बोरनारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सभेत कल्याण दांगोडे, बाळासाहेब संचेती, डॉ. भागवत कराड, विशाल संचेती यांनीही विरोधकांवर टीकास्त्र सोडले. सूत्रसंचालन कैलास पवार यांनी केले.

Comments are closed.