लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट; जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता! | Ladki Bahin Scheme: Two Installments Together!

Ladki Bahin Scheme: Two Installments Together!

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. आता जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, दोन्ही हप्ते मिळून सुमारे ₹3000 रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.

Ladki Bahin Scheme: Two Installments Together!

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा होती; मात्र निवडणुकीनंतरही पैसे जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे आता दोन्ही महिन्यांचे हप्ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, अनेक महिलांच्या e-KYC प्रक्रियेत चुकीची माहिती भरल्यामुळे काही लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांची माहिती अपूर्ण किंवा चुकीची आहे त्यांनी तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.