लाडकी बहीण योजना : नव्या वर्षात ‘या’ महिलांचा लाभ कायमचा बंद; दरमहा ₹१५०० मिळणार नाहीत! | Ladki Bahin Scheme: Benefits Stopped for Some Women!

Ladki Bahin Scheme: Benefits Stopped for Some Women!

लाडकी बहीण योजनेबाबत महिलांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच उद्यापासून अनेक लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले जाणार आहे. त्यामुळे काही महिलांना आता दरमहा मिळणारे ₹१५०० कायमचे बंद होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Scheme: Benefits Stopped for Some Women!

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांसाठी KYC (केवायसी) प्रक्रिया अनिवार्य केली होती. मात्र, ज्या महिलांनी ठरलेल्या मुदतीत केवायसी पूर्ण केली नाही, त्यांचा योजनेचा लाभ थांबवला जाणार आहे. आज ही केवायसी करण्याची शेवटची तारीख असून, अद्यापही अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

आज केवायसी नाही, तर उद्यापासून लाभ नाही!
केवायसी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, लाभ सुरू ठेवायचा असेल तर महिलांनी तात्काळ केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसीसाठी मुदतवाढ मिळेल का, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. मात्र, सध्याच्या माहितीनुसार मुदतवाढ मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. जर आज अधिकृत घोषणा झाली नाही, तर मुदत संपल्यानंतर केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ थांबवला जाईल.

अपात्र महिलांनाही बसणार मोठा फटका
या योजनेत केवायसीद्वारे महिलांची उत्पन्न तपासणी केली जाणार आहे. यामध्ये महिलांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेतून कुटुंबाचे एकूण उत्पन्न समोर येणार असून, अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना पुढे ₹१५०० मिळणार नाहीत.

म्हणूनच, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल, तर आजच केवायसी पूर्ण करा—नाहीतर नवीन वर्षात तुमचाही लाभ कायमचा बंद होऊ शकतो!

Comments are closed.