लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? यावेळी दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता! | Ladki Bahin Scheme: Two Installments Likely!

Ladki Bahin Scheme: Two Installments Likely!

राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आचारसंहिता लागू असतानाही या योजनेचा हप्ता वितरित करण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात येत असून, यावेळी महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. महापालिकांच्या मतदानाच्या दोन ते चार दिवस आधी हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Ladki Bahin Scheme: Two Installments Likely!

या योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा १,५०० रुपये अनुदान दिले जाते. निवडणूक कालावधी लक्षात घेता महिलांना सलग दोन महिन्यांचा हप्ता एकदम देण्याचा विचार असून, त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. मात्र अद्याप अधिकृत वितरण तारखेची घोषणा झालेली नाही.

दरम्यान, या योजनेतील केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार, सुमारे २ कोटी ४२ लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ १ कोटी ६० लाख महिलांनी केवायसी पूर्ण केली आहे. योजनेत बोगस लाभार्थी, पुरुष तसेच काही शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे प्रकार समोर आल्याने केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. केवायसीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून, त्यानंतर सुमारे ५० ते ६० लाख लाभार्थी आपोआप वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक आचारसंहितेबाबत राज्य निवडणूक आयोगानेही स्पष्ट भूमिका मांडली आहे. ही योजना आधीपासून सुरू असल्याने निवडणूक कालावधीत अनुदान वितरणावर कोणताही प्रतिबंध नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना यावेळी दोन हप्त्यांचा लाभ एकत्र मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.