मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र २०२६ पासून लागू झालेल्या नव्या KYC व DBT नियमांमुळे अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही.
विशेष म्हणजे KYC पूर्ण असूनही पैसे न येण्यामागे बँक खाते प्रकार, आधार-NPCI लिंकिंग आणि तांत्रिक अडचणी ही मुख्य कारणे ठरत आहेत.
राज्य शासनाच्या तपासणीत असे आढळले की SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, PNB, युनियन, कॅनरा, सेंट्रल व इंडियन बँक यांसारख्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते असल्यास पैसे लवकर जमा होतात. याउलट अनेक जिल्हा व तालुका सहकारी बँका DBT/NPCI प्रणालीशी पूर्ण जोडलेल्या नसल्याने तिथे हप्ते ‘Pending’ किंवा ‘Failed’ होत आहेत.
संयुक्त खाते, अल्पवयीन खाते, निष्क्रिय खाते, काही पोस्ट ऑफिस खाती तसेच आधार-NPCI मॅपिंग नसलेली खाती यामध्ये हप्ता जमा होत नाही. फक्त आधार लिंक असणे पुरेसे नसून तो NPCI सर्व्हरवर Seeded असणे आवश्यक आहे. तसेच नावातील छोटा फरक किंवा खात्याची मर्यादा (Transaction Limit) ही देखील अडचण ठरू शकते.
हप्ता मिळवण्यासाठी महिलांनी शक्यतो राष्ट्रीयीकृत बँकेत वैयक्तिक खाते उघडावे, बँकेत DBT/NPCI seeding तपासावी, खाते सक्रिय ठेवावे आणि ‘नारी शक्ती दूत’ ॲपवर बँक तपशील अपडेट असल्याची खात्री करावी. योग्य दुरुस्ती केल्यास रखडलेला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

Comments are closed.