राज्यातील लाडक्या बहिणींना नववर्षापूर्वी मोठे गिफ्ट! दोन महिन्यांचे पैसे एकत्र खात्यात जमा होण्याची चर्चा! | Ladki Bahin Likely Double Installment Before New Year!

Ladki Bahin Likely Double Installment Before New Year!

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू असतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने लाखो लाडक्या बहिणी आपल्या सन्माननिधीची वाट पाहत होत्या. ऑक्टोबरचा हप्ता मिळाल्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता थांबल्याने अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

Ladki Bahin Likely Double Installment Before New Year!

दरम्यान, आता 2026 हे नवे वर्ष सुरू होण्याआधीच फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार अशी जोरदार चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच प्रत्येकी ₹1500 प्रमाणे एकूण ₹3000 रुपये एकाच वेळी थेट खात्यात वर्ग होऊ शकतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता, तसेच काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे निधी वितरणास तात्पुरता विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या काळातही अशाच प्रकारे महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचा मिळून सन्माननिधी जमा करण्यात आला होता. त्या वेळी सरकारकडून ‘डबल गिफ्ट’ देण्यात आले होते, आणि यंदाही तसाच निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात थकीत नोव्हेंबरचा आणि चालू डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र, या वृत्ताला अद्याप राज्य सरकार किंवा महिला व बालविकास विभागाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या ही माहिती चर्चेच्या पातळीवर असून अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून अजूनही अनेक लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा भविष्यात योजनेचा लाभ थांबवण्यात येऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून, नववर्षापूर्वी सन्माननिधीचा लाभ घ्यायचा असेल तर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

Comments are closed.