लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आता फक्त १० दिवस उरले असून ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. या मुदतीनंतर अंतिम पात्र यादी जाहीर केली जाणार आहे.
सध्या पडताळणीचा तिसरा टप्पा सुरू असून मोठ्या प्रमाणात छाननी केली जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. आतापर्यंत ४५ लाखांहून अधिक महिलांची नावे यादीतून काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जानेवारीनंतर कोणताही हप्ता जमा झालेला नसल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकूण ₹3000 रक्कम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा १० एप्रिलपर्यंत खात्यात जमा होऊ शकते.
मात्र, यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अत्यावश्यक आहे. प्रक्रिया पूर्ण न केल्यास, पात्र असूनही ₹1500 प्रति महिना मिळणारा लाभ बंद होऊ शकतो. अपूर्ण कागदपत्रे किंवा चुकीची माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो.
राज्य सरकारने याआधीच चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी अंतिम संधी दिली होती. आता त्या दुरुस्तीसाठीही शेवटचे १० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थींनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करून आपला हप्ता सुरक्षित करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.