लाडकी बहीण योजनेत आता महिलांना e-KYC करणं बंधनकारक झालंय. योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर केवायसी वेळेत पूर्ण करणं फार गरजेचं आहे. सरकारनं यासाठी ऑनलाइन प्रोसेस सुरू केली आहे आणि दोन महिन्यांचा कालावधी दिलाय.
पण या प्रक्रियेत अनेक लाडक्या बहिणींना त्रास होतोय. कोणाला OTP येत नाही, तर कोणाच्या मोबाईलवरच वेबसाईट उघडत नाही. साइटचं लोड इतकं वाढलंय की एकदम “हँग” होते. अनेक जणींनी तक्रारी केल्यात की, e-KYC करायला गेल्यावर तांत्रिक अडचणी आडव्या येतात.
याचं मुख्य कारण म्हणजे, एकाच वेळेला हजारो महिलांनी लॉगिन करून KYC करायला सुरुवात केलीये. त्यामुळे वेबसाईटवर प्रचंड लोड येतोय. म्हणूनच अनेकांना OTP येईपर्यंतच सिस्टिम फ्रीज होतेय.
उपाय काय?
तज्ज्ञ सांगतात की, रात्री १२ नंतर किंवा पहाटे ४ ते ५ च्या वेळेत e-KYC करायचं. कारण त्या वेळेला साइटवर फारसं लोड नसतं. अशावेळी OTPही पटकन येतो, आणि KYC सहज पूर्ण होतं.
पण लक्षात ठेवा, घाईघाईत चुकीची माहिती भरली, तर योजनेचा लाभ थांबू शकतो. त्यामुळे KYC करताना काळजीपूर्वक आणि बरोबरच माहिती भरावी.
थोडक्यात:
आधार नंबरशिवाय ₹1500 मिळणार नाही.
OTP अडतोय? मग मध्यरात्री केवायसी करा.
घाई करू नका, पण नियम पाळा.
