महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात दिले जातात. जानेवारी 2026 च्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी असून, पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे अनेक महिलांना ही एक सुखद आणि अनपेक्षित भेट ठरली आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती देत सांगितले की, 23 फेब्रुवारीपासून तांत्रिक प्रक्रिया सुरू असून पुढील 2–3 दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार-संलग्न खात्यात पैसे जमा होतील.
दरम्यान, निवडणूक आचारसंहितेमुळे जानेवारीचा हप्ता रखडला होता आणि फक्त डिसेंबरचा हप्ता देण्यात आला होता. आता जानेवारी 2026 चा हप्ता ₹1500 जमा होत आहे. मात्र फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही.
योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य असून, तांत्रिक अडचणी लक्षात घेता ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
पैसे आले का, कसे तपासाल?
- बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा
- बँकेच्या मोबाईल अॅप / स्टेटमेंट तपासा
- काही वेळा SMS येत नाही, त्यामुळे खात्री करून पाहणे महत्त्वाचे
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कुटुंबाला आधार देणे आणि स्वावलंबन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, पात्र महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून लाभ सुरू ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.