लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हप्ते एकत्रितपणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० रुपये एकत्र जमा होऊ शकतात.
सध्या प्रत्येक महिन्यात १५०० रुपये देण्यात येतात आणि ऑक्टोबरचा हप्ता नुकताच वितरित केला गेला आहे.
हप्ते एकत्र येण्यामागचे मुख्य कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आचारसंहिता काळ आहे. नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे निधी थोडा विलंबीत दिला जाऊ शकतो. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी असेच पैसे एकत्र दिले गेले होते.
लाडक्या बहिणींनी e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी सूचना मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. सध्या याबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही, पण हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता आहे.

Comments are closed.