लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला! महिलांना ₹१५०० कधी मिळणार? | Ladki Bahin Installment Delayed, When ₹1500?

Ladki Bahin Installment Delayed, When ₹1500?

महाराष्ट्र सरकारची Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. मार्च महिना संपत आला तरीही फेब्रुवारी महिन्याचा ₹१५०० हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्याचा हप्ताही उशिरा मिळाला होता, त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये येईल अशी अपेक्षा होती, मात्र अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.

Ladki Bahin Installment Delayed, When ₹1500?

दरम्यान, आता अशी चर्चा सुरू आहे की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात येऊ शकतात. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाचवेळी ₹३००० जमा होण्याची शक्यता आहे. हे पैसे एप्रिल महिन्यात, विशेषतः १५ एप्रिलपूर्वी जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही किंवा केवायसीमध्ये त्रुटी आहेत, त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे. त्यामुळे सर्व लाभार्थींनी ३१ मार्चपर्यंत आपली eKYC तपासून आवश्यक दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

Comments are closed.