लाडकी बहीण हेल्पलाइन सुरू!-Ladki Bahin Helpline Launched!

Ladki Bahin Helpline Launched!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही मासिक हप्ता मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. काही प्रकरणांत ई-केवायसी अपूर्ण राहणे किंवा प्रक्रियेदरम्यान अडचणी येणे यामुळे लाभ थांबल्याचे आढळून आले आहे.

Ladki Bahin Helpline Launched!या वाढत्या तक्रारींची दखल घेत लाभार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासनाने १८१ क्रमांकाची विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट मार्गदर्शन आणि मदत मिळणार आहे.

महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी समाजमाध्यमांवरून ही माहिती दिली. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे काही लाभार्थ्यांचे पैसे अडकले असल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजनेशी संबंधित कोणतीही शंका, तक्रार किंवा अडचण असल्यास लाभार्थ्यांनी १८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.