लाडकी बहीण योजनेत तब्बल ४ लाख महिलांनी खोटे पत्ते देऊन निधी मिळवण्याचा प्रयत्न केला, असे पडताळणीत समोर आले आहे. आतापर्यंत या योजनेतून २६ लाख ३४ हजार महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले असून अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू आहे.
पडताळणीत असे उघड झाले की, अनेक महिलांनी खोटे पत्ते दिले होते; काही ठिकाणी तर घरच नव्हते. सोलापूर जिल्ह्यातील साडेदहा हजार महिलांनी चुकीचे पत्ते दिल्याचेही आढळले आहे. यामुळे सरकारच्या निधीचा मोठा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याआधी, काही सरकारी कर्मचारी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले होते; आता मात्र ४ लाखांपेक्षा जास्त महिलांनी चुकीची माहिती देऊन निधी मिळवण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाचा निर्णय:
पूर्वी एका रेशन कार्डवर फक्त दोन महिलांना योजनेचा लाभ मिळत होता. पण आता जर घरातील महिलांकडे वेगवेगळे रेशन कार्ड असतील, तर त्या सर्वांना योजनेचा लाभ मिळेल. म्हणजेच, एकाच घरातील महिलांसाठी आता वेगवेगळ्या रेशन कार्डवरून लाभ घेता येईल.