‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत नियम तोडून लाभ घेतलेल्या २६ लाख ३० हजार महिलांची अंगणवाडी ताईमार्फत तपासणी सुरु आहे. रत्नागिरीत यातील किती महिला अपात्र ठरतील, हे पाहायला थोडा वेळ लागणार आहे. काही जण नियम मोडून योजनेत घुसलेले असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने पडताळणीचे काम सुरू केले आहे.
गेल्या महिन्यापासून काही जिल्ह्यांमध्ये तपासणी चालू आहे. प्राप्त झालेल्या याद्यांमध्ये अनेक लाभार्थी महिलांचे शहर-तालुकी प्रमाणे नावे आहेत. त्यामुळे अंगणवाडी ताईला लाडक्या बहिणींचा शोध घेताना जोराचा कस लागतोय.
वय आणि अर्ज बदलून फायदा
सध्याच्या नियमांनुसार वय जुळत नसेल किंवा कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभार्थी असतील, तर ताई पडताळणी करत आहेत. अनेक ठिकाणी नाव-पत्ता जुळत नसल्यानं पडताळणी अवघड जातेय. काहींनी वयाची अट (२१ पेक्षा कमी किंवा ६५ पेक्षा जास्त) तोडून तारीख बदलून अर्ज केला आणि योजनेचा लाभ मिळवला.
वाढत्या नियमांमुळे आता योजनेचा फायदा किती महिलांना मिळणार, यावर चर्चा सुरु आहे. एकाच कुटुंबात तीन ते चार महिलांनी लाभ घेतल्यामुळे शासनाने नियम कडक केले आहेत. आता दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्यांचा लाभ जूनपासून थांबवण्यात आला आहे.
अर्जांची तपासणी सुरू असून अपात्र आणि पात्र लाभार्थींचा निकाल पडताळणीवर अवलंबून आहे. यामध्ये अनेक अडचणी येत आहेत आणि दीड-दोन महिन्यांनंतरही पूर्ण पडताळणी झाली नाही. पुढच्या टप्प्यात जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांचा लाभही बंद होणार आहे. जूनपासून अनेक लाडक्या बहिणींना लाभ मिळत नसल्याचे तक्रारीतून समोर येत आहेत आणि ज्यांचा लाभ थांबला आहे, त्यांच्याकडून रिक्सर फॉर्म भरून घेण्यात येत आहे.