अगं बहिणींनो, तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची बातमी आली आहे! लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर eKYC दुरुस्ती करणे आता अत्यावश्यक झाले आहे. कारण यासाठी फक्त शेवटचे १० दिवसच उरले आहेत. सरकारने स्पष्ट केलं आहे की, ज्या महिलांची eKYC पूर्ण आणि बरोबर असेल त्यांनाच ₹१५००चा लाभ मिळणार आहे.

याआधी eKYC करण्याची अंतिम तारीख संपली होती, त्यामुळे अनेक महिलांचे पैसे थांबले. काहींनी घाईत किंवा माहिती नीट न समजल्यामुळे चुकीची माहिती भरली होती. पण आता सरकारने पुन्हा एकदा संधी दिली आहे. eKYC दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ही संधी अजिबात दवडू नका.
अनेक बहिणींचा लाभ फक्त छोट्या चुका झाल्यामुळे बंद झाला आहे. प्रश्न नीट न समजल्याने चुकीची उत्तरे दिली गेली आणि त्याचा थेट परिणाम पैशांवर झाला. पण आता ही चूक सुधारण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे लगेच action घ्या.
eKYC दुरुस्ती कशी कराल? (Step-by-Step)
- सर्वप्रथम adakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा
- “eKYC दुरुस्ती” या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा आधार नंबर टाका
- रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP टाका
- आवश्यक माहिती नीट भरा
- विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या
- शेवटी तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल
लक्षात ठेवा, वेळ खूप कमी आहे! ३१ मार्च २०२६ आधीच eKYC दुरुस्ती पूर्ण करा, नाहीतर ₹१५००चा लाभ हातातून जाऊ शकतो.

Comments are closed.