मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य सरकारने eKYC प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. आता सर्व लाभार्थ्यांना नव्याने eKYC करता येणार नाही. फक्त ज्यांच्या eKYC प्रक्रियेत आधी चूक झाली आहे, त्यांनाच पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करता येणार आहे.

राज्यातील अनेक महिलांनी अर्ज भरताना eKYC करताना चुकीचे पर्याय निवडले होते किंवा माहिती अपूर्ण राहिली होती. अशा लाभार्थ्यांसाठी शासनाने विशेष दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ज्या महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत eKYC केलेच नाही, त्यांना आता नव्याने eKYC करता येणार नाही आणि त्यांना १५०० रुपयांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोर्टलवर काय दिसत आहे?
पोर्टलवर स्पष्ट संदेश देण्यात आला आहे –
“ही eKYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते.”
म्हणजेच, ही सुविधा केवळ दुरुस्तीपुरती मर्यादित आहे.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधारशी संलग्न बँक खाते आणि योग्य eKYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. ज्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित होते किंवा eKYC मध्ये चूक झाली होती, त्यांनी तातडीने पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच रखडलेले हप्ते खात्यात जमा होणार आहेत.
एकाचवेळी ६ हजार रुपये जमा होणार?
विश्वसनीय सूत्रांनुसार, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरमध्ये जमा झाला होता. त्यानंतर पडताळणी प्रक्रियेमुळे पुढील हप्ते रखडले आहेत.
सरकारने प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला हप्ता जमा करण्याचे सांगितले होते; मात्र पडताळणी सुरू असल्याने रक्कम थांबली होती. नवीन आर्थिक वर्षात हे सर्व रखडलेले हप्ते एकाचवेळी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निष्कर्ष
फक्त eKYC मध्ये चूक झालेल्या महिलांनाच दुरुस्तीची संधी आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी त्वरित पोर्टलवर जाऊन माहिती दुरुस्त करावी, अन्यथा योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते.

Comments are closed.