लाडकी बहीण योजनेची eKYC झाली का नाही, हे आता घरबसल्या ऑनलाइन तपासून पाहता येतं. प्रक्रिया अगदी सरळसोट आहे.सुरुवातीला तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचं. तिथं तुम्हाला eKYC असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं.
यानंतर केवायसी विभागात तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायला सांगितलं जाईल. आधार टाकल्यानंतर कॅप्चा भरून, आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी एंटर करायचा.
जर तुमची KYC आधीच पूर्ण असेल, तर स्क्रीनवर KYC Completed असा मेसेज येईल. जर नसेल तर पुढची प्रक्रिया सुरू होईल.
पुढच्या टप्प्यात तुमचे पती किंवा वडील यांची KYC पूर्ण करायची असते. त्यासाठी त्यांचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागतो.

Comments are closed.