लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! ई-केवायसीत चूक झाली असेल तर ३१ मार्च २०२६ पर्यंत दुरुस्ती करा! | Ladki Bahin e-KYC correction till March 31!

Ladki Bahin e-KYC correction till March 31!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट आवाहन करत सांगितले आहे की, ज्या लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत चूक झाली आहे, त्यांनी ती ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्की दुरुस्त करून घ्यावी.

Ladki Bahin e-KYC correction till March 31!

यापूर्वी लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेदरम्यान काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्याने त्यांचा योजनेचा लाभ थांबवण्यात आला होता. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी/कंत्राटी कर्मचारी आहेत की नाहीत, निवृत्तीवेतन घेतात की नाहीत, अशा मुद्द्यांवर चुकीची माहिती भरली गेली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या पात्र महिलांनी ई-केवायसी करूनही अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व महिलांना आता ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ३१ मार्च २०२६ पर्यंत दुरुस्ती करता येणार आहे.

आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमधून सांगितले की, “सर्व पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी ती दुरुस्त करून घ्यावी.”

दरम्यान, जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार? याकडेही लाडक्या बहिणींचे लक्ष लागले असून, ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्त्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.