लाडकी बहिण e-KYC मुदतवाढ – नव्या तारखेपूर्वी e-KYC करा, १५०० रुपये खात्यात मिळवा! | Ladki Bahin e-KYC New Deadline!

Ladki Bahin e-KYC New Deadline!

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ची अंतिम तारीख नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडथळ्यांमुळे १८ नोव्हेंबर २०२५ वरून पुढे ढकलण्यात आली आहे.

Ladki Bahin e-KYC New Deadline!

मंत्री अदिती तटकरे यांनी X वर पोस्ट करताना सांगितलं की—
“राज्यात अलीकडे आलेल्या संकटांमुळे अनेक पात्र बहिणींना वेळेत e-KYC करता आलं नाही. त्यांच्या अडचणीला गांभीर्यानं घेत राज्य सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.”

नवी e-KYC अंतिम तारीख
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व लाभार्थींनी e-KYC पूर्ण करणं अनिवार्य आहे.

लाडकी बहीण योजनेचे फायदे
या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात DBT द्वारे दिले जातात.
उद्दिष्ट— आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य- पोषण सुधारणा, आणि महिलांचा निर्णयक्षमतेत सहभाग वाढवणे.

e-KYC सर्वांसाठी बंधनकारक
योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आधारद्वारे e-KYC करणे आवश्यक आहे.

विधवा / घटस्फोटीत लाभार्थ्यांसाठी
अशा महिलांनी—
स्वतःचं e-KYC पूर्ण करावं
पती/वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र / घटस्फोटाचा दाखला / न्यायालयीन आदेश यांच्या सत्य प्रती जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांना द्याव्यात.

e-KYC न केल्यास काय होईल?
दिलेल्या मुदतीत आधार प्रमाणीकरण न केल्यास योजनेचा आर्थिक लाभ बंद होऊ शकतो.

दरवर्षी e-KYC अनिवार्य
प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून पुढील दोन महिन्यांत e-KYC करणे आवश्यक आहे, अन्यथा लाभात खंड पडू शकतो.

e-KYC कुठे उपलब्ध?
सरकारने e-KYC सुविधा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीय:
https://ladakibahin.maharashtra.gov.in

लाडकी बहीण योजना e-KYC कसे करावे? (सोप्या ८ स्टेप्स)

  • अधिकृत वेबसाइटवर जा:
    https://ladakibahin.maharashtra.gov.in
  • होमपेजवरील e-KYC बॅनरवर क्लिक करा
  • आधार क्रमांक, कॅप्चा टाका → Send OTP
    परवानगी द्या आणि पुढे जा.
  • प्रणाली तपासते की तुमचा आधार क्रमांक मंजूर यादीत आहे का
    नसेल तर संदेश दिसेल:
    “Aadhaar number is not in the eligible list of the scheme.”
  • OTP भरून सबमिट करा
  • पती/वडिलांचा आधार क्रमांक → कॅप्चा → Send OTP
  • पती/वडिलांच्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा
  • पुढील माहिती भरा:
    जात प्रवर्ग निवडा
    दोन घोषणा द्या:
    कुटुंबातील कोणीही शासकीय/महानगरपालिका/बोर्ड/पीएसयूमध्ये कायम नोकर नाही अथवा पेन्शनधारक नाही
    कुटुंबातील फक्त १ विवाहीत आणि १ अविवाहित महिला लाभ घेत आहेत

बॉक्स टिक करून Submit करा.
शेवटी संदेश दिसेल—
“Success – Your e-KYC verification has been successfully completed.”

Comments are closed.